आरती श्री बिरदेवाची
जयदेव जयदेव जय श्री बिररायां । आरती ओवाळू तुज गारूडीया । जय ।।धृ. ।।
श्री शिववरदा सहाय्यक विष्णु हा तुझसी। सुवर्णकाया गंगा सुरवंती ऐशी।
अयोनीसंभव तिचे उदरी अवतरसी । नारद- पूरचे रानीं ख्यातीं तू करिशी। जय. ।। १ ।।
कोलागिरीत बाललीला दाविली । माता बालाई ती मोहोन गेली।
मायाण्णाचे संगे बकरी त्वां वळिली। मातुल दर्प हरोनी कामवती वरली ।। २ ।।
मुरगुंडीचे ठायी तप केले गहन । भेटीलागी विठ्ठल आले चालून।
ऐनापुरात करिती भक्त परीक्षण। भागिर्थी ही तुजला भेटे येऊन । जय. ।। ३ ।।
दुष्टा दंडुनि जोडीले भक्त अपार। कोडोलीचे ठायी राहसी साचार।
नारायण पुजारी, सोमा महालदार। प्रधान हैगडी, तुज बोत्या कटीकर । जय. ।।४।।
कल्लेश्वर देई तुज जागा निर्धारी। नारूग्राम पुढारी मिळून सत्वरी।
मंडप उभारणी करिताती चतुरी। खेलूभक्ताकरवी यात्रा भरविशी थोरी पवित्र ऐसे दुसरे न स्थान। जय. ।। ५ ।।
यवनी दिधली भूमी पुजाऱ्या दान । ऐसे चरित्र हे मोठे महिमान।
नरहरी विनवी बिरदेवा देई वरदान । जय. ।। ६ ।।

0 Comments