आरती श्री विठ्ठरायाची
जयदेव जयदेव जय विठू राया । भंडार भूषाण, कंबळी निशाण छतरी छाया ।। जय. जय. ।। धृ. ।।
द्वारकाधीशः श्रीकृष्ण मुरारी । विठ्ठल बिरापावर डुलती चवरी।
कोडोली नगरात महिमान भारी । अश्विन महिन्यात यात्रा तैयारी । जय. ।। १ ।।
बहुकष्ट भोगिले देवेंश्रीहरी । लेकी भागासाठी गेले दूरवरी।
नवखंड पृथ्वी धुंडोनी सारी। भक्तासाठी गेले खेलूच्या घरी । जय. ।। २ ।।
भावाचा भुकेला विनवितो भारी। खेलूबासी म्हणे घ्यावा पदरी।
अकरा महिने संसार करावा घरी । बाराव्या महिन्यात यात्रा तैयारी । जय. ।। ३ ।।
गुरूच्या वचनी खेलू हा भक्त। सीमोल्लंघन खेळोनी मार्ग क्रमित ।
येवोनी ठेपला कोडाली पर्यंत । विठ्ठल बिरापाची वाट पहात । जय. ।।४।।
खेलू भक्त म्हणे आपुल्या मनी । दुरोनी आलो रस्ता चालोनी ।
भेटी नाही दिली मजशी देवांनी । म्हणोनी बैसला दूर रूसनी । जय. ।।५।।
कन्नड भागाच्या दूध घागरी । बाशिंग आले ढोलगजरी ।
जन जत्रा आली सर्वंमानकरी । खडकाच्या माळाला रहिवास भारी । जय. ।। ६ ।।
सोमा पाचारोनी ग्रामपुढारी । घेवोनी आला भाणसघरी।
चाले समारंभ ढोलगजरी । येवोनी ठेपला देवमंदिरी । जय. ॥७॥
विठू बिरू म्हणे सर्व लोकांसी । समजावूनी आणा खेलू भक्तासी ।
जावा तुम्ही आता ढोलगजरेसी । येऊनी भेटेल तुम्हा सर्वांशी ।।८।।
खेलूस आणण्या ढोलांची दाटी । भक्त उधळती भंडारमुठी ।
समारंभ जाता खेलूच्या दृष्टी । संतोषे येवूनी सर्वांना भेटी । जय. ।। ९।।
पाच रोज कर्पूर पाजळील्या वाती । भागाई बंधूसी ओवाळी आरती ।
करा संसार येथूनी पुढती । नमो नारायण विठ्ठल बिरपती । जय. ।। १०।।

0 Comments