*श्री विठ्ठल बिरदेव भेट — अध्याय १९*
भगवान विष्णूंनी विठ्ठल रूप धारण करून बिरदेवांना भेटायला जाण्याचे ठरवले. कारण त्यांच्या मायावी लीलेंचा अंत करायचा होता. विठ्ठल जात असताना बिरदेवांनी अनेक मायाजाल तयार केली – मंत्र, यज्ञ, भुजंग, आणि संहारासाठी तयार केलेल्या शक्ती.
विठ्ठलांनी संपूर्ण शुद्ध भावाने सर्व अडथळ्यांवर मात केली. त्यांनी स्वतः बिरदेवांना नम्रतेने सांगितले,
"हे विश्वेश्वर, आपली माया पुरे करा. मी आपल्याला भेटण्यासाठी आलो आहे."
त्यामुळे बिरदेवांनी आपले मायाजाल थांबवले आणि विठ्ठलाशी आलिंगन केले. ही भेट शिव-विष्णूच्या अवतारांची दिव्य भेट ठरली.
यानंतर, विठ्ठल-बिरदेवांचा जयजयकार करत देवमेळा संपन्न झाला.
ज्या ठिकाणी बिरदेव तपश्चर्येस बसले होते त्या ठिकाणी तीन वृक्ष आहेत. मुरगुंडी गावात हे वृक्ष पहावयास मिळतात. कानडीमध्ये 'मूर' म्हणजे मराठीत तीन. तीन झाडांच्या मुळांशी बिरदेवांनी तपश्चर्या केली आहे. तीन वृक्षमुळींचा सिद्ध, म्हणून 'मूरसिद्ध' असा विठ्ठलांनी उद्घोष करून मूरसिद्ध असे त्याला नांव दिले. मुरगुंडी गावात बिरदेवांनी तपश्चर्या केली म्हणून तेथील देवाला मुरगुंडी मूरसिद्ध असे म्हणतात.

0 Comments