जयदेवी जयदेवी गंगा सुरवंता । आरती ओवाळू तुज बिरदेव माता । जय. ।। धृ. ।।
सीतेसम भूमीत जन्म घेऊनी । धृवाईत राजाची कन्या होऊनी ।
तारूण्यापर्यंत राज्यी राहूनी। निर्जन वन सेवी तू रत शिवध्यानी । जय. ।। १ ।।
निर्जन वनी तुंवा तप केले घोर। तपोबलाने झाले शंकर ।
उठ पुत्रवती म्हणता त्रिनेत्र । वचनात बांधीला तू उमावर । जय. ।। २।।
शिववराने तूज गर्भ राहीला। नारायण बंधूने छळीले तुजला ।
परी पाठीसी बिर राहिला । अयोनी संभव तुझे उदरी जन्माला। जय. ।। ३ ।।
बाळघातास्तव ये ती राजदूत। बिरदेवासी ते हिरावून नेत।
परी अंतरी तुझशी माहीत । बिरदेव नाही काळाला भीत। जय. ।। ४ ।।
वैराग्याची तू विशाल मूर्ती। बालबुद्धीने मी करीतो आरती ।
स्वीकारावी माते माझी ही भक्ती । आलो शरण मी दास तुज प्रती। जय. ।। ५ ।।
0 Comments